उसने पैसे परत मिळविण्यासाठी दुचाकी हिसकावणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:40+5:302021-02-05T04:19:40+5:30
पोलिसांनी सांगितले की, सिल्लोड येथील कचरू मुकुंद नागरे हे वाहनचालक आहेत. त्यांनी आरोपी सलामपुरेकडून काही रक्कम उसनी घेतली होती. ...

उसने पैसे परत मिळविण्यासाठी दुचाकी हिसकावणे पडले महागात
पोलिसांनी सांगितले की, सिल्लोड येथील कचरू मुकुंद नागरे हे वाहनचालक आहेत. त्यांनी आरोपी सलामपुरेकडून काही रक्कम उसनी घेतली होती. तेव्हापासून ते सलामपुरेला भेटत नव्हते. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी दुपारी नागरे हे दुचाकीवरून समर्थनगर येथे रस्त्यावरून जात असताना आरोपीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर नागरे दुचाकीवरून सिल्लेखान्याकडे जाऊ लागले. तेव्हा आरोपीने त्यांना अडवून मारहाण केली आणि त्यांची दुचाकी हिसकावून नेली. पैसे देत नाही तोपर्यंत दुचाकी मिळणार नाही, असे त्याने तक्रारदारांना सांगितले. या घटनेनंतर नागरे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सलामपुरे यास अटक केली. त्याच्याकडून नागरे यांची दुचाकी जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे या घटनेचा तपास करत आहेत.