दुचाकीची नोंदणी न करता बनावट नंबर टाकणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:23+5:302020-12-17T04:31:23+5:30
शोएब कुरेशी अन्वर कुरेशी (२५, रा. बडा तकीया, सिल्लेखाना), मतीन मोईन खान (रा. बुढीलेन), एजाज कुरेशी अब्बास कुरेशी अशी ...

दुचाकीची नोंदणी न करता बनावट नंबर टाकणे पडले महागात
शोएब कुरेशी अन्वर कुरेशी (२५, रा. बडा तकीया, सिल्लेखाना), मतीन मोईन खान (रा. बुढीलेन), एजाज कुरेशी अब्बास कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारी आणि कर्मचारी १३ डिसेंबर रोजी रात्री गस्तीवर होते. तेव्हा मोटारसायकलवर क्रमांक (एमएच-२०-ईएम-५२२७) ट्रिपल सीट जाणाऱ्यांना संशयावरुन पोलिसांनी रोखले. पोलिसांनी त्यांच्याकडे दुचाकीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. पोलिसांनी पकडताच तरुण उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी खाक्या दाखवला असता त्यांनी दुचाकीची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केली नसल्याचे आणि पोलीस कारवाई करतात म्हणून विना पासिंग वाहनांवर बनावट क्रमांक टाकल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिघांविरूध्द क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.