भागिदारीचे आमिष दाखवून ६ लाख रुपयांना गंडविले
By Admin | Updated: May 30, 2014 00:27 IST2014-05-29T23:28:54+5:302014-05-30T00:27:12+5:30
जालना: व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून मित्रास ६ लाख २५ हजारास गंडविल्या प्रकरणी एका विरूद्ध गुरूवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागिदारीचे आमिष दाखवून ६ लाख रुपयांना गंडविले
जालना: व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून मित्रास ६ लाख २५ हजारास गंडविल्या प्रकरणी एका विरूद्ध गुरूवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील खडकपूरा भागातील शेख फारूख शेख इब्राहीम व चौधरी नगर भागातील शेख अकबर शेख महेमूद हे दोघे मित्र आहेत. मागील वर्षी २ जुलै २०१३ ते २ एप्रिल २०१४ या काळात शेख अकबर यांनी ‘मी प्लॅस्टिक स्क्रेप विकत घेऊन ते वाळूज, मुंबई येथे नेऊन विक्री करतो. या व्यवसायात तुला अर्धा हिस्सा देतो’ असे म्हणून शेख फारूख यांच्या कडून चेक व रोख असे एकूण ६ लाख २५ हजार रूपये घेतले. हिस्सा न देता पैसे घेऊन फसवणूक केली. दरम्यान पैसे परत मागण्यासाठी अनेक वेळा मागणी करूनही ते परत केले नाही. त्यामुळे या प्रकरणी गुरूवारी शेख फारूख यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने शेख अकबर शेख महेमूद विरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि किरण बिडवे हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार राजेश निर्मल यांनी दिली. (प्रतिनिधी)