निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST2021-09-27T04:05:17+5:302021-09-27T04:05:17+5:30

यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, औरंगाबाद : मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले. अत्याचारी, ...

It is unfortunate for Marathwada that people of Nizam's ideology get elected | निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी,

औरंगाबाद : मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले. अत्याचारी, पाशवी निजामाचा पराभव केला. कासीम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात, हे दुर्दैवी असल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एमआयएम’चे नाव न घेता केली.

लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समोराप कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. मराठवाड्याला एक वर्षे दोन महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत सरकार मदतीला आले; परंतु मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा कासीम रझवी हा शरण आला, तेव्हा त्यास भारतात राहायचे की पाकिस्तानात, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने पाकिस्तानची निवड केली. निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला. मात्र आज त्याच निजामाच्या विचाराचे लोक महानगरपालिकांसह इतर ठिकाणी निवडून येत आहेत, हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे, असे आव्हाड म्हणाले.

चौकट,

मराठवाडा उपेक्षित कसा

कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा उपेक्षित राहिला असल्याचे सांगितले. त्यावर बोलताना गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, मराठवाड्याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करताना शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अमित देशमुख, राजेश टोपे यांच्यासह इतर मंडळी राज्याचे धोरण ठरविण्यामध्ये असते. तरीही मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यात आणण्यासाठी शंकरराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यामुळे विकास झाला नाही, असे कसे म्हणता येईल, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

Web Title: It is unfortunate for Marathwada that people of Nizam's ideology get elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.