शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे...कारच्या टपावर ठेवलेले पंधरा लाख रुपये पडले आणि कुणीतरी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:00 IST

पाचोड येथील एका पतसंस्थेचे पंधरा लाख औरंगाबादेतील बँकेत जमा करण्यासाठी आणताना कारच्या टपावरून पडले आणि कुणीतरी उचलून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी केम्ब्रिज चौकात घडली.

ठळक मुद्दे पोलिसांकडून चौकशी: पतसंस्थेची रक्कम, पोलिसांकडून कसून शोध

औरंगाबाद : पाचोड येथील एका पतसंस्थेचे पंधरा लाख औरंगाबादेतील बँकेत जमा करण्यासाठी आणताना कारच्या टपावरून पडले आणि कुणीतरी उचलून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी केम्ब्रिज चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली.पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-१ येथील रहिवासी संजयकुमार पाटणी हे पाचोड येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आहेत. या पतसंस्थेतील जमा होणारी रक्कम ते औरंगाबादेतील बँकेत जमा करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी पतसंस्थेत जमा झालेले पंधरा लाख रुपये घेऊन ते रात्री औरंगाबादेत आले. रात्री ते सिडको एन-१ येथील त्यांच्या घरी मुक्कामी थांबले होते. गुरुवारी सकाळी जालना येथील एका कार्यक्रमासाठी त्यांना जायचे होते. मात्र तत्पूर्वी ही रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक असल्याने त्यांनी पंधरा लाख रुपयांचे असलेले पाकीट कारच्या सीटखाली ठेवले. मात्र गडबडीत ते नातेवाईक महिलांना कारमध्ये बसवून जालन्याकडे निघाले. काही वेळानंतर त्यांच्या भावाने त्यांना फोन केला आणि पंधरा लाख रुपये कारमध्ये तुमच्यासोबत आल्याने तुम्ही असाल तेथेच थांबा असे सांगितले. तेव्हा पाटणी हे केम्ब्रिज शाळेसमोरील चौकात होते. पाटणी यांनी रस्त्याच्या बाजूला कार उभी केली आणि कारमधील पैशाचे पाकीट बाहेर काढून कारच्या टपावर ठेवून भावाची प्रतीक्षा करू लागले. तेव्हा त्यांच्या भावाने पुन्हा फोन करून तुम्ही विमानतळापर्यंत या, मी इकडून येतो, असे सांगितले. त्यामुळे पाटणी हे बोलतच कारमध्ये बसले आणि केम्ब्रिज चौकातून वळून ते पुन्हा चिकलठाणा विमानतळाकडे निघाले. कारच्या टपावर ठेवलेले पैशाचे पाकीट खाली पडले. शहराकडून जालन्याकडे जाणाऱ्या काळी-पिवळी जीपचालकाला हे पाकीट पडलेले दिसले. त्याने पाकीट उचलले. तेव्हा एक जण पळत त्यांच्याजवळ आला आणि ते पाकीट माझे आहे, असे म्हणाला. त्यामुळे काळी-पिवळी जीपचालकाने पैशाचे पाकीट त्या व्यक्तीला दिले. तो माणूस झाल्टा फाट्याकडे जाणाºया रिक्षामध्ये बसून गेला. दरम्यान पाटणी यांना पैशाचे पाकीट टपावरच विसरल्याचे लक्षात आल्याने ते लगेच पुन्हा वळण घेऊन केम्ब्रिज चौकात आले. ते पाकीट एक जण घेऊन गेल्याचे समजले. या घटनेची माहिती पाटणी यांनी लगेच एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शेख अफरोज, सपोनि. सत्यजित ताईतवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद