‘आत्ता येतो’, म्हणून मित्राची दुचाकी लंपास
By Admin | Updated: March 31, 2015 00:36 IST2015-03-30T23:59:46+5:302015-03-31T00:36:03+5:30
जालना : पेट्रोल पंपावर जाऊन आत्ता येतो, असे म्हणत मित्राच्या मोटारसायकलची चावी घेऊन मोटारसायकल लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.

‘आत्ता येतो’, म्हणून मित्राची दुचाकी लंपास
जालना : पेट्रोल पंपावर जाऊन आत्ता येतो, असे म्हणत मित्राच्या मोटारसायकलची चावी घेऊन मोटारसायकल लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील कदीम जालना पोलिस ठाण्यात आरोपी दत्तात्रय दादासाहेब घायवट (रा. पानगव्हाण, ता. वैजापूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील संजयनगर भागातील रहिवासी संतोष शिवाजीराव जाधव (वय २५) यांची दत्तात्रय घायवट याच्याशी मैत्री होती. २ मार्च रोजी घायवट शहरात आल्यानंतर संतोष यांच्याकडे गेला व मला पेट्रोलपंपावर काम आहे, आत्ता येतो, असे सांगत संतोष यांच्या मोटारसायकलची (एम.एच.२०/बी.ई.७५५४) चावी घेतली. मोटारसायकल घेऊन घायवट पसार झाला, तो ३० मार्चपर्यंत परतला नाही, किंवा त्याचा काही निरोपही आला नाही.
त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षा करून संतोष जाधव यांनी सोमवारी कदीम जालना पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय घायवट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले. (प्रतिनिधी)