शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

रिक्षाचालकांवर कारवाईची जबाबदारी तुमचीसुद्धा; आरटीओच्या भूमिकेवर पोलिस आयुक्त नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:19 IST

संयुक्त कारवाईसाठी पोलिसांचाच पुढाकार

छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसांपासून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईसाठी पोलिस रस्त्यावर उतरलेले असताना आरटीओ विभाग केवळ कारवाईच्या घोषणा करण्यात वेळ घालवत आहे. गुरुवारी पोलिस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आरटीओच्या रिक्षाचालकांबाबतच्या या बोटचेप्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांइतकीच रिक्षाचालकांवर कारवाईची जबाबदारी तुमचीदेखील आहे. पोलिसांचे मनुष्यबळ मदतीला देतो, परंतु कठोर कारवाई करा, असे सांगत पवार यांनी संयुक्त कारवाईची सूचना केली.

२ जून रोजीच्या रिक्षाचालकांकडून तरुणाच्या हत्येनंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. २०२१ ते २०२३ मध्ये तीसपेक्षा अधिक गुन्ह्यांत रिक्षाचालकांचा सहभाग निष्पन्न झाला. रिक्षात बसलेल्या प्रवाशांची लूटमार, महिला, तरुणींसोबत गैरप्रकार, अंमली पदार्थांच्या तस्करीसह लुटमारीच्या सातत्याने शहरात घडत आहेत. रिक्षा व्यवसायात या वाढत्या गुन्हेगारीबाबत ‘लोकमत‘ने वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांबाबत कारवाईची मोहीमच हाती घेतली. त्यात बुधवारच्या कारवाईत मद्यधुंद अवस्थेतले रिक्षाचालक रंगेहाथ पकडले गेले.

कारवाई करा, आम्ही मदत करतो‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी आयुक्तालयात आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी आरटीओच्या रिक्षाचालकांवरील कारवाईबाबतच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. बेशिस्त रिक्षाचालकांची समस्या गंभीर आहे. पोलिसांचे कारवाईचे अधिकार सीमित आहेत. आरटीओने अधिकारांचा वापर करून बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांविरोधात कठोर भूमिका घ्यावी. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या, भरमसाठ दंड प्रलंबित ठेवणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करा, नूतनीकरण करू नका, शक्य असल्यास रिक्षा जप्त करा, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलिस तुम्हाला मदत करतील, असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त धनंजय पाटील उपस्थित होते.

गुरुवारी ७ रिक्षा जप्त, ५ मद्यपी चालक ताब्यातगुरुवारी रात्रीदेखील वाहतूक पोलिसांनी ८१ रिक्षाचालकांची तपासणी केली. त्यात ७ रिक्षा जप्त केल्या. गुरुवारी देखील ५ रिक्षाचालक नशा केलेले आढळल्याचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस