शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

'अपेक्षा ठेवणे गैर नाही', मंत्री होणारच यावर शिरसाट ठाम; 'त्या' ट्विटवर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:44 IST

जिल्ह्यातील मंत्री पदाच्या संख्येची अडचण नाही, मला मंत्रिपद मिळणारच

औरंगाबाद: राजकारणात अपेक्षा ठेवणे गैर नाही. जिल्ह्यात किती मंत्री आहेत याला काही अडचण नाही. मंत्री संपूर्ण राज्याचा असतो जिल्ह्याचा नसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील मंत्रिमंडळ विस्तारात नक्की विचार करू असे म्हटले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात काही अडचण नाही, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. 

मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आ. संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी सायंकाळी आ. शिरसाट यांचे औरंगाबादेत आगमन झाले. यावेळी देखील त्यांनी आपण मंत्री बनणार असे माध्यमांना सांगितले. मात्र, रात्री अचानक आ. शिरसाट यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करण्यात आले. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जुने भाषण होते. त्यावर कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे असे कॅप्शन होते. त्यामुळे शिरसाट यांची घरवापसी होणार, अशा चर्चा सुरु झाल्या. यावर आता आ. शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून हा तांत्रिक गोंधळ आहे असे स्पष्ट केले आहे. चुकून मागील व्हिडिओ फॉरवर्ड झाला. मी नाराज नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे असे शिरसाट म्हणाले. 

पालकमंत्री होण्याची इच्छाजिल्ह्यात किती मंत्री आहेत,याचा मला मंत्रीपद काही अडसर नाही. मंत्री झाल्यास कोणी जिल्ह्यात बसत नसतो. तो राज्यात काम करतो. प्रत्येक शहरात, खेड्यात जातो. यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात नक्कीच मंत्रिपद मिळेल. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी मला पालकमंत्री होण्याची इच्छा आहे. शहराचा विकास खूप मंदगतीने होत आहे. मागील काही काळात जिल्हावासीयांनी जे सोसले त्याचा मी साक्षीदार आहे. यामुळे ठोस काम करण्याची माझ्यात ताकद आहे,असेही आ. शिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे