शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बाळासाहेबांच्या मुलाला बाजूला करून स्वतः पद घेणे पाप; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 19:25 IST

महाविकास आघाडीच्या आग्रहावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले.

औरंगाबाद: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छोट्या शिवसैनिकांना मोठे केले. पद दिले, आमदार केले. परंतु, त्याच्या मुलाला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाजूला करून स्वतः पद घेयचे. बंडखोरी करून आमदारांनी पाप केले आहे. हा बाळासाहेबांना धोका देणे आहे, अशा भावना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केल्या. ज्यांना शिवसेनेने  मोठे केले, सर्वकाही दिले त्यांचे असे वागणे चुकीचे असे सांगताना खैरे यांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. 

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि तीन आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अशी वाताहत झाल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भावूक झाले आहेत. मुंबईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देऊन परत आल्यानंतर खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांनी केलेले कृत्य म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धोका देण्यासारखे आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट रिक्षाचालक तर मंत्री संदीपान भुमरे कारखान्यात कामगार होते. अशा सामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केलं.आमदार केले. अशा शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राला बाजूला करून स्वतः पद घेयचे हे पाप आहे. महाविकास आघाडीच्या आग्रहावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले. अडीज वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे केली. शिरसाट, भुमरे यांनी सर्वात जास्त निधी मिळवला. त्यांना काय कमी केले. त्यांना काय कमी पडले, असा सवालही खैरे यांनी बंडखोरांना केला.

चुकले कुठे ? नितीमत्ता नाही राहिलीअसे बंडखोरी करून काय मिळणार. ऐवढे सगळे मिळूनही त्यांनी बंडखोरी केली. पक्षाने त्यांना खूप काही दिले. आयुष्य बदले. मतदारसंघात मोठा विकास निधी मिळाला. महाविकास आघाडी अडीज वर्ष केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे टिकली. त्यांना धोका देणे चुकीचे आहे. या लोकांकडे नितीमत्ता राहिली नाही, अशी खंतही खैरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ