गुन्ह्यामागील पार्श्वभूमी ओळखणे महत्त्वाचे : पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST2020-12-24T04:06:01+5:302020-12-24T04:06:01+5:30
पुढे बोलताना मोक्षदा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण पोलीस प्रशासनातील पोलीस पाटील हा महत्त्वाचा दुवा असून, त्यांनी जागरूक नागरिक म्हणून ...

गुन्ह्यामागील पार्श्वभूमी ओळखणे महत्त्वाचे : पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील
पुढे बोलताना मोक्षदा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण पोलीस प्रशासनातील पोलीस पाटील हा महत्त्वाचा दुवा असून, त्यांनी जागरूक नागरिक म्हणून काम करण्याची गरज आहे. यावेळी कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला. महिला प्रतिनिधी एस. एस. ठाकूर यांनी तर घाटमाथा पत्रकार संघातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. संजय गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, पिशोरचे सपोनी बालाजी वैद्य, उपनिरीक्षक विजय आहेर, पोलीस कर्मचारी, हद्दीतील पोलीस पाटील सुरेश जाधव, संतोष पाटील, भागीनाथ मोकासे, किशोर जाधव आदींसह महिलांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. संजय गायकवाड यांनी केले.
छायाचित्र - पिशोर येथे आयोजित मेळाव्यात बोलताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील.