भाडेकरूची माहिती न देणे महागात पडले

By Admin | Updated: October 1, 2014 00:45 IST2014-10-01T00:45:44+5:302014-10-01T00:45:44+5:30

औरंगाबाद : आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संबंधित पोलीस ठाण्यात माहिती न देणे फुलंब्रीच्या तीन घरमालकांना चांगलेच महागात पडले.

It did not have to give the details of the tenant | भाडेकरूची माहिती न देणे महागात पडले

भाडेकरूची माहिती न देणे महागात पडले

औरंगाबाद : आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संबंधित पोलीस ठाण्यात माहिती न देणे फुलंब्रीच्या तीन घरमालकांना चांगलेच महागात पडले. या तिन्ही घरमालकांविरुद्ध दहशतवाद विरोधी सेल (ग्रामीण)ने फुलंब्री ठाण्यात गुन्हा नोंदविला.
निवडणूक आणि तोंडावर सणासुदीच्या काळात बाहेरराज्यातील काही समाजकंटक औरंगाबादेत येऊन घातपाती कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरहून येणारे हे समाजकंटक येथे भाड्याने घर घेऊन राहतील आणि घातपात करून निघून जातील, अशी शक्यता आहे. यापूर्वी मुंबई, पुण्यात घडलेल्या घातपाती कारवायांमध्ये असेच घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व घरमालकांना आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची इत्थंभूत माहिती संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या या आवाहनानंतर घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, फुलंब्री शहरातील आनंद हिरासेठ पाटणी, सर्जेराव बाजीराव जाधव व समिरोद्दीन मोईनोद्दीन या तिघांना आपल्या घरात परप्रांतीय भाडेकरू ठेवलेले असून, त्यांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात दिलेली नाही, अशी माहिती औरंगाबाद ग्रामीणच्या दहशतवाद विरोधी सेलला मिळाली. सेलचे फौजदार संजीव भोसले, कर्मचारी सुनील खरात, लक्ष्मीकांत सपकाळ यांनी फुलंब्रीला जाऊन या तिघांच्या घराची तपासणी केली.

Web Title: It did not have to give the details of the tenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.