शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी कनेक्टिव्हिटी’ला बूस्ट! छ. संभाजीनगरहून बंगळुरू विमान आता आठवड्यातून चार दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:20 IST

छत्रपती ३१ मार्चपासून संभाजीनगर ते बंगळुरू उड्डाणांमध्ये वाढ; सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमान झेपावणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातून आयटी राजधानी बंगळुरूकडे जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिगोने ''समर शेड्यूल २०२६'' अंतर्गत छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस केली आहे, अशी माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हील एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.

सध्या ही विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे. ३१ मार्चपासून लागू होणाऱ्या या नव्या वेळापत्रकानुसार सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवशी या विमानाचे नियमित उड्डाणे होणार आहेत. दुपारनंतरची वेळ असल्याने व्यावसायिक, आयटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरत आहे. विशेष म्हणजे, या वाढीव सेवेमुळे छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू यांमधील अंतर केवळ वेळेतच नव्हे, तर संधींमध्येही कमी होणार आहे. आयटी, स्टार्टअप्स आणि शिक्षण क्षेत्रासाठी ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची मानली जाते. शहरातून मोठ्या प्रमाणात बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते.

उद्योग, पर्यटन, शिक्षण क्षेत्राला फायदाया निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू यांच्यातील हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत होणार असून, उद्योग, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्राला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः आयटी हब असलेल्या बंगळुरूसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी स्थानिक उद्योगांसाठीही सकारात्मक पाऊल मानले जात आहे. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या प्रगतीसाठी वाढलेले उड्डाण महत्त्वाचा टप्पा ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : IT Connectivity Boost: Aurangabad-Bangalore Flight Now Four Days a Week

Web Summary : Aurangabad-Bangalore flights increase to four days weekly from March 31st. This benefits IT professionals, students, and businesses, enhancing connectivity for industry, tourism, and education sectors. The move is expected to boost local industries and foster growth.
टॅग्स :airplaneविमानchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBengaluruबेंगळूर