शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्त्यांच्या कामांचा मुद्दा ऐरणीवरच

By admin | Updated: February 16, 2016 23:36 IST

हिंगोली : समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करूनही कामांचा पत्ता नाही.

हिंगोली : समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करूनही कामांचा पत्ता नाही. पंचायत समितीकडून पत्राचे नाहक भांडवल केले जात असेल तर प्रत्येक काम तेवढ्याच काटेकोरपणे होते काय? हे तपासावे लागेल, असा इशारा जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांनी दिला.यंदाची दुष्काळी स्थिती पाहता भविष्यात पाणीटंचाईमुळे कामे रखडता कामा नये, ही खूणगाठ बांधून दलित वस्ती सुधार योजनेचे वेळेत नियोजन केले होते. या योजनेत मंजूर असलेला सर्व १९.१४ कोटी रुपयांचा निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. तर संपूर्ण ३१७ दलित वस्त्यांमध्ये कामे करण्यास मंजुरी दिलेली आहे. परंतु ३ लाखांवरील कामांना ई-निविदा काढण्याचा शासन आदेश आल्यानंतर ही कामे ठप्प पडली होती. ही कामे करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतींची अडचण झाली होती. मात्र जुन्या व नव्या शासन निर्णयाचा संदर्भ देत शासनाने मार्गदर्शक सूचना देत सक्षम ग्रामपंचायतींनी मागणी केल्यास त्यांना स्वत: कामे करता येतील, असे पत्र दिले होते. त्याचा आधार घेत पंचायत विभागाने बीडीओंना पत्र दिले. त्यानंतर जनसुविधा योजनेतील कामे सुरू झाली. मात्र हा निकष समाजकल्याणचे काम असल्याने तेथे लागू होत नसल्याचे काही बीडीओ म्हणत आहेत. यात समाजकल्याणचे पत्र लागणार असल्याचे ते म्हणतात. मात्र पूर्वी समाजकल्याणच्या शासन निर्णय ग्रामपंचायतींना लागू होत नाही, ग्रामविकासचाच हवा, अशी भूमिका घेतली गेली होती. या सोयीच्या अर्थ काढण्याच्या पद्धतीमुळे उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे जाम भडकले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत जो निर्णय घ्याचा तो वेळेत घेवून कामे मार्गी लागतील, याची काळजी घेण्याचे भ्रमणध्वनीवरून अधिकाऱ्यांना कळविले. तर समाज कल्याण विभागानेही पत्र देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)