शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची अधिसूचना काढा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 06:54 IST

Aurangabad Airport: मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात  काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळविले आहे.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नामांतराच्या या मुद्यावरून भाजपने शिवसेनेवर आरोप केले आहेत. आता औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडले आहे.  याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांना स्मरणपत्र पाठविले आहे. 

छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णयया पत्रात म्हटले आहे की, या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याचा ठराव विधिमंडळाच्या अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी.

परस्पर नामांतर करू नका; थोरातांनी सुनावलेमुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅंडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा केल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती व जनसंपर्क विभागाला चांगलेच सुनावले आहे. महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, शहारांचे नामांतर हा आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे थोरात यांनी ट्विटरवर म्हटले आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो की, सामाजिक सलोखा टिकण्यासाठी शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सीएमओ ट्विटर हॅन्डलवर संभाजीनगर असा उल्‍लेखमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून राज्‍य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्‍लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे.  औरंगाबाद हे नाव त्‍यात कंसात देण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे