१५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन
By Admin | Updated: September 7, 2014 00:24 IST2014-09-07T00:05:41+5:302014-09-07T00:24:32+5:30
अहमदपूर : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यातील १५ अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे़ त्यामुळे आता या केंद्रातून चिमुकल्यांना आणखीन दर्जेदार शिक्षण मिळणार आहे़

१५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन
अहमदपूर : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यातील १५ अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे़ त्यामुळे आता या केंद्रातून चिमुकल्यांना आणखीन दर्जेदार शिक्षण मिळणार आहे़
तालुक्यातील लांजी, मावलगाव, केंद्रेवाडी, वळसंगी, शिवणखेड, उंबरगा कोर्ट, शिरूर ताजबंद, थोरलेवाडी, महादेववाडी, धानोरा बु़, सताळा, मोळवन, सांगवी, टेंभूर्णी या गावातील अंगणवाड्या ह्या गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि दानशूर गावकऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून सुसज्ज करण्यात आले आहे़ या अंगणवाड्यांतील जागेची सजावट, स्वच्छता आदींची पाहणी प्रशांत जोशी यांच्या पथकाने महिनाभरापूर्वी केली होती़
या पथकामध्ये नितीन पाटील, अजय पाटील, रमेश पालवे, गोपाळ यादव यांचा समावेश होता़ या पथकाने पूर्व प्राथमिक शिक्षण, लोकसहभाग याची पाहणी केली होती़ तसेच किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची चौकशी करून मुलाखती घेतल्या होत्या़ या तपासण्यानंतर १५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाल्याचे पत्र औरंगाबादचे प्रमुख प्रशांत जोशी यांच्याकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाला मिळाले आहे़ या अंगणवाड्यांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर अन्य चांगल्या सवयीही चिमुकल्यांना लागणार आहेत़ जिल्ह्यामध्ये आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचा पहिला मान अहमदपुरातील संत ज्ञानेश्वर विद्यालयाने मिळविला आहे़ त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंगणवाड्या आयएसओ होण्याचा मानही अहमदपूरने पटकाविला आहे़ (वार्ताहर)
सरपंच, गावकरी यांच्या मदतीतून अंगणवाड्या सुसज्ज झाल्या़ त्यामुळे तालुक्यातील पंधरा अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळाला़ या अंगणवाड्यातून चिमुकल्यांना आणखीन दर्जेदार शिक्षण व संस्कार मिळणार असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी एस़एऩ मांजरमकर यांनी सांगितले़
४अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळावे म्हणून प्रकल्प अधिकारी एस़एम़मांजरमकर, वरिष्ठ सहाय्यक सचिन काडवादे, हरिश्चंद्र वाघमारे, रमेश भरडे, अनुपमा पाटील, उषा सोळंके, ए़एऩआकनगिरे, एस़एम़आढाव, एस़एनक़ांबळे, लक्ष्मीबाई पाटील आदींनी परिश्रम घेतले़