ऊसतोड मजूर पाल्यांच्या शाळेला मिळाले आयएसओ
By Admin | Updated: December 30, 2016 22:19 IST2016-12-30T22:00:06+5:302016-12-30T22:19:40+5:30
केज : महाराष्ट्र शासन व संचालनालय पुणे यांच्याद्वारा सुरू केलेल्या ऊसतोड कामगार पाल्यांच्या साने गुरूजी निवासी शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे.

ऊसतोड मजूर पाल्यांच्या शाळेला मिळाले आयएसओ
केज : महाराष्ट्र शासन व संचालनालय पुणे यांच्याद्वारा सुरू केलेल्या ऊसतोड कामगार पाल्यांच्या साने गुरूजी निवासी शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. काळाच्या ओघात अत्याधुनिक शिक्षण पद्धतीची प्रणाली पाहून हा दर्जा देण्यात आला आहे.
आश्रम शाळाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असला तरी या निवासी शाळेने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. अनुदानित तत्त्वावर या शाळेत ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना शिक्षण दिले जाते.
या शाळेला शैक्षणिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा आय. एस. ओ. दर्जा मिळाला आहे. हा दर्जा मिळवणारी व्हिजेएन्टी मधील ऊसतोड प्रवर्गातील ही महाराष्ट्रातील पहिली शाळा ठरली आहे.
या शाळेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. बीड येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात आय. एस. ओ. मानांकन प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, देवीदास धस, शिक्षणाधिकारी हिगोंणेकर यांच्या प्रमुख उपस्थित साने गुरूजी निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक अॅड. उद्धवराव कराड, डॉ. कविता कराड, राजेश कापसे व सर्व कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. (वार्ताहर)