झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:02 IST2021-06-02T04:02:26+5:302021-06-02T04:02:26+5:30
शेख असिफ शेख अनवर (३६) असे मयताचे नाव आहे. शेख असिफ हे संजयनगर येथील एका हार्डवेअर दुकानात कामाला ...

झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
शेख असिफ शेख अनवर (३६) असे मयताचे नाव आहे. शेख असिफ हे संजयनगर येथील एका हार्डवेअर दुकानात कामाला होता. लॉकडाऊन लागू झाल्यापासून दुकान बंद असल्यामुळे तो घरीच होता. दरम्यान, ३१ मे रोजी त्याचे कुटुंबीय नातेवाइकाच्या लग्नाला गेले होते. घरी एकटाच असलेल्या असिफ यांनी वाड्यातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. लग्न आटोपून घरी आलेल्या त्याच्या नातेवाइकांना हा प्रकार दिसला. यानंतर त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याविषयी जिन्सी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली.
चौकट
खिशात आढळून आली सुसाइड नोट
असिफ याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी 'मी स्वेछेने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस हवालदार जे. जी. जेढर तपास करीत आहेत.
(फोटोसह )