पाच उमेदवारांची काढण्यात आली ईश्वर चिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:06 IST2021-01-19T04:06:51+5:302021-01-19T04:06:51+5:30

नादरपूर ग्रा. पं. च्या प्रभाग क्र. २ मधून किसन निकम व गणेश निकम यांना प्रत्येकी २५५ मते पडली. ईश्वर ...

Ishwar Chithi was drawn for five candidates | पाच उमेदवारांची काढण्यात आली ईश्वर चिठ्ठी

पाच उमेदवारांची काढण्यात आली ईश्वर चिठ्ठी

नादरपूर ग्रा. पं. च्या प्रभाग क्र. २ मधून किसन निकम व गणेश निकम यांना प्रत्येकी २५५ मते पडली. ईश्वर चिठ्ठीत किसन निकम यांना विजय मिळाला. नेवपूर (खा.) ग्रा.म. प्र. २ मधील राजू भिसे व बाबासाहेब सुरडकर यांना प्रत्येकी २०५ मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीत राजू भिसे यांना कौल मिळाला. देभेगाव येथील प्र. १ मधील संगीता बोडखे व अनिता बोडखे यांना प्रत्येकी २०१ मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीत अनिता बोडखे विजयी झाल्या. तपोवन ग्रामपंचायतच्या प्र.१ मधील कांताबाई नागरे व कमल सोनवणे यांना प्रत्येकी १३० मते मिळाली. कांताबाई नागरे यांची चिठ्ठी निघाल्याने त्या विजयी झाल्या. रामपूरवाडीत प्रभाग १ मधून अनिता बळे व कमलबाई साठे यांना प्रत्येकी २२२ मते मिळाली. त्यात अनिता बळे या विजयी ठरल्या. तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली १५ टेबलवर २१ फेऱ्यात मतमोजणी पूर्ण करण्यात आली. पोनि. रामेश्वर रेंगे, सुनील नेवसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Ishwar Chithi was drawn for five candidates