शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची अनियमितता भोवणार; 'वाल्मी'च्या माजी महासंचालकांसह तिघांना ‘कारणे दाखवा’

By बापू सोळुंके | Updated: February 7, 2025 12:46 IST

पैठण रोडवरील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने पीक व पाणी व्यवस्थापन, पाणीवापराचे तंत्र याविषयी शेतकरी आणि विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेतील (वाल्मी) अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. या पार्श्वभूमीवर शासनाने वाल्मीचे माजी महासंचालक व्ही. बी. नाथ, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी लब्बा आणि लेखाधिकारी सरला देशमुख यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.

पैठण रोडवरील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने पीक व पाणी व्यवस्थापन, पाणीवापराचे तंत्र याविषयी शेतकरी आणि विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येते. जलसंपदा, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही येथे नियमित प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी संस्थेत प्राचार्य आणि प्राध्यापक कार्यरत आहेत. जलसंधारण विभागांतर्गत या स्वायत्त संस्थेचा कारभार महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चालविण्यात येतो.

‘वाल्मी’चे तत्कालीन महासंचालक नाथ, प्रशासकीय अधिकारी आणि लेखाधिकारी यांनी निविदा प्रक्रिया न राबविता सभागृह व सांस्कृतिक भवन नूतनीकरण, सिमेंट नाला योग्य ठिकाणी न बांधणे आणि कॅशबुक, लेखापुस्तिकेत नोंदी न करणे आदी तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या.शासनाच्या आदेशाने ‘वाल्मी’चे आयुक्त तथा प्रभारी महासंचालक प्रकाश खपले यांनी प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत नाथ, लब्बा आणि सरला देशमुख यांनी आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता केल्याचे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. हा अहवाल सादर केल्यानंतर शासनाने या नोटिसा बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीत काय आढळले?शासनाची पूर्वपरवानगी न घेताच संस्थेच्या १० कोटींच्या दीर्घ मुदत ठेवी मोडून रक्कम ठेकेदाराला अदा केली. संस्थेच्या महसुली जमा खात्यातील २ कोटी रुपयेही नियमित खर्चाच्या खात्यात वर्ग केले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा ३ कोटी १ लाख रुपयांचा निधीही नियमित खर्चासाठी वापरला.

लब्बा यांची बीड येथे बदली झाल्यानंतर पदमुक्त करण्यात आल्यानंतर तेथे रुजू न होता सुटीच्या दिवशी ‘वाल्मी’मध्ये येऊन आर्थिक, देवाण-घेवाण करीत असल्याचे दिसून आले होते. लेखाधिकारी देशमुख यांनी परवानगी नसताना ‘वाल्मी’चे वाहन वापरल्याचे आणि याबाबतच्या अनधिकृत नोंदी घेतल्याचे दिसून आले.

मंत्री राठोड यांनी दिले होते कार्यवाहीचे आश्वासनमागील महिन्यात जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ‘वाल्मी’त बैठक घेतली, तेव्हा अनेकांनी या तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. तेव्हा त्यांनी संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आता नोटिसानंतर या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले................. 

टॅग्स :Waterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी