लोखंडी रॉडने मारहाण; १७ हजार पळविले

By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-03T23:48:17+5:302014-08-04T00:52:18+5:30

कुरूंदा : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर शिवारात चाकूचा धाक दाखवून एकास लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याजवळील १७ हजार रुपये व ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पळविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

Iron rodney assault; 17 thousand fell | लोखंडी रॉडने मारहाण; १७ हजार पळविले

लोखंडी रॉडने मारहाण; १७ हजार पळविले

कुरूंदा : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर शिवारात चाकूचा धाक दाखवून एकास लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याजवळील १७ हजार रुपये व ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पळविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून रविवारी कुरूंदा पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत रामा मोतीराम मुळे (रा. औंढा) यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने औंढा न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून आरोपी बाळू नारायण बुलाखे, आशफाक चाँदसाब बागवान (रा. शिरडशहापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २७ जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रामा मुळे हा औंढ्याहून वसमतकडे मोटारसायकल क्र. एम. एच. ३८ -५५२७ वरून निघाला होता. शिरडशहापूर येथील वीटभट्टीजवळ आॅटोरिक्षा क्र. एम. एच. २२ - व्ही. १५७५ मधून आलेल्या त्या दोघांनी मोटारसायकल थांबवून चाकूचा धाक दाखवत रामा मुळे यांच्या खिशातील १७ हजार रुपये व ६ ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरीने काढून घेतली. तसेच रॉडने डोक्यात मारून अश्लील शिवीगाळ करून कोठे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक तपास वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सिद्धोधन जोंधळे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Iron rodney assault; 17 thousand fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.