लोहा बाजार समिती निवडणुकीचा बिगुल
By Admin | Updated: February 27, 2016 00:03 IST2016-02-26T23:53:55+5:302016-02-27T00:03:37+5:30
लोहा ; राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या लोहा मतदारसंघातील लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला

लोहा बाजार समिती निवडणुकीचा बिगुल
लोहा ; राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या लोहा मतदारसंघातील लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़ तर १८ रोजी मतमोजणी होणार आहे़
४१८ जागांसाठी होत असलेल्या लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सेवा सहकारी सोसायटीचे १०६५ मतदारसंख्या आहे़ ग्रा़पं़चे ९८२, हमाल मापाडीचे ३१४ तर व्यापारीचे २५७ असे एकूण २६१८ मतदारसंख्या आहे़ लोहा बाजार समितीअंतर्गत एकूण ९ उपबाजारपेठ आहेत़ त्यामध्ये सोनखेड, कापशी, माळाकोळी, कलंबर, मारतळा, पेनूर, उमरा, आष्टूर व शेवडी (बा़) अशी आहेत़आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत २००८ मध्ये मतदारांनी चिखलीकरांच्या पॅनलला साथ दिली व रुस्तुमराव धुळगुंडे यांना सभापतीपद देण्यात आले़ मुदत संपल्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रशासनाकडे बाजार समितीची सूत्रे सोपविण्यात आले होते़
४२४ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून एकूण १८ संचालकांची निवड मतदारांतून केली जाणार आहे़ त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी मतदारसंघातून २ व हमाल मापाडी मतदारसंघातून १ अशी आहे़ त्यासाठी सर्वसाधारणमधून १२, अनुसूचित जाती जमाती-१, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-१, महिला-२, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग-१ व इतर मागासवर्गीय-१़
४निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एस़व्ही़ गिणगिणे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी़ बी़ बोधगिरे हे काम पाहत आहेत़ २४ रोजी पहिल्या दिवशी एकही अर्ज विक्री झाला नसल्याची माहिती गिणगिणे यांनी दिली़
बाजार समिती आपल्या हाती पुन्हा ठेवण्यासाठी आ़ प्रतापराव चिखलीकर प्रयत्नशील आहेत़ तर त्यांना एकटे पाडण्यासाठी त्यांचे विरोधक एकवटण्याची शक्यता आहे़ एकूणच लोहा बाजार समितीची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.