शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ‘आयपीएल’ सट्टेबाजांचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 12:11 IST

IPL bookies exposed in Aurangabad मुख्य सूत्रधार मनोज दगडा याच्यासह अन्य बुकींचा शोध

ठळक मुद्देया प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहेशहरातील सट्टेबाजांची पाळेमुळे खोलवर रुजलेली

औरंगाबाद : सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळविणाऱ्या एकाला जिन्सी पोलिसांनी छापा मारून अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास जुना मोंढा भागात करण्यात आली. गणेश कचरू व्यवहारे (३५, रा. गल्ली क्र. ५, न्यू हनुमाननगर), असे अटक करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे.

गणेश याच्या ताब्यातून २४ हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल हस्तगत केले. तथापि, मुख्य सूत्रधार मनोज दगडा याच्यासह अन्य बुकींचा पोलीस शोध घेत आहेत. २९ सप्टेंबरपासून दुबईतील आबुधाबी येथे आयपीएल क्रिकेट मॅच सुरू आहे. या सामन्यावर मोबाईलच्या माध्यमातून सट्टा लावला जात असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी जुना मोंढा परिसरात सापळा रचून गणेश व्यवहारे यास ताब्यात घेतले. तेव्हा गणेश, निसार व खान हे मोबाईलवर व्हॉटसअ‍ॅप तसेच कॉलद्वारे मनोज दगडा हा सट्ट्याचा भाव सांगत असे. त्यानुसार हे तिघे जण शहरातील नागरिकांकडून पैसे घेऊन मनोज दगडा याच्याकडे सट्टा लावत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी कुख्यात सट्टेबाज मनोज दगडा याच्यासह त्याचे हस्तक गणेश व्यवहारे, निसार आणि खान यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मनोज दगडा हा सट्टा जिंकल्यावर त्याच्या हस्तकांमार्फत पैसे पुरवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यात आसीफ भाई, अमजत सेठ, साजीद, मामू, असे हस्तकदेखील मोबाईल आयडीद्वारे आयपीएलवर पैसे लावून सट्टा खेळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार हारुण शेख, पोलीस नाईक संजय गावंडे, शिपाई सुनील जाधव, संतोष बमनावत, होमगार्ड शेख बासीत यांनी केली.

मनोज दगडाची बड्यांसोबत ऊठबसशहरातील सट्टेबाजांची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक राजकीय पुढारी, उद्योजक, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत ऊठबस आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांचाही त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्यात येत नसल्याची चर्चा आहे.  २०१४ मध्ये तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी मयत नरेश धमार्जी पोतलवाड, तसेच मनोज दगडा आणि दत्ता खडके यांना आयपीएल सट्टाप्रकरणी अटक केली होती. त्यानंतरही तो सट्ट्याच्या व्यवहारात सक्रियच होता. तरीही कालपर्यंत त्याच्याविरुद्ध पोलिसांकडून कारवाई झाली नव्हती.

टॅग्स :IPL 2020IPL 2020AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी