आवक घटली, भाव वाढले

By Admin | Updated: June 4, 2017 00:41 IST2017-06-04T00:39:31+5:302017-06-04T00:41:03+5:30

औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता.

Inward decline, price increased | आवक घटली, भाव वाढले

आवक घटली, भाव वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता. नाशिकमधून येणाऱ्या फळभाज्यांची आवक कमालीची घटली. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जाधववाडीच्या अडत बाजारपेठेत फळभाज्या-पालेभाज्या आणल्याच नाही. तरी शहरातील विविध ठिकाणच्या भाजीमंडईत फळभाज्या सहज मिळत होत्या. पण ग्राहकांना त्या खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत होती.
औरंगाबादेत नाशिक जिल्ह्यातून फुलकोबी, पत्ताकोबी, काकडी, दोडके, लवंगी मिरची, कारले, भेंडी आदी फळभाज्यांची आवक होत असते. मात्र, शनिवारी नाशिकहून जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फळभाज्यांची आवक झालीच नाही. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही थेट बाजार समितीत पालेभाज्या आणणे टाळले. पण तरीही जाधववाडीच्या फळभाजीपाला अडत बाजारात पहाटेपासून किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील भाज्या विक्री करणे सुरू केले होते. सकाळीच संप मागे घेतल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. पण नंतर संप मागे घेण्यात आला नाही, अशाही बातम्या ऐकायला मिळाल्या. यामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. यामुळे या अडत बाजारात भाज्या विक्रीला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे येथील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, जेथे २०० पेक्षा जास्त विक्रेते बसतात, तेथे आज जेमतेम ५० विक्रेतेच भाजी विकताना दिसून आले. भाज्या येणार नसल्याने काही अडत्यांनी तर आपली दुकानेही उघडली नाही. बाजार समितीमध्ये शनिवारी एकाही भाजीची आवक झाल्याची नोंद नाही. आवक घटल्याने (पान ७ वर)

Web Title: Inward decline, price increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.