गुंतवणूकदार त्रस्त
By Admin | Updated: July 29, 2014 01:12 IST2014-07-28T23:42:25+5:302014-07-29T01:12:48+5:30
आंबा चोंढी : वसमत तालुक्यातील चोंढी या छोट्याशा गावातही केबीसी कंपनीचे तीन एजंट कार्यरत होते.

गुंतवणूकदार त्रस्त
आंबा चोंढी : वसमत तालुक्यातील चोंढी या छोट्याशा गावातही केबीसी कंपनीचे तीन एजंट कार्यरत होते. त्यांनी अनेकांना गंडविले असून गुंतवणूकदार अडचणीत आले तरी एजंट मात्र सुरक्षित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सुरूवातीला एक वर्षाच्या हप्त्यानंतर मुद्दल रक्कम परत मिळायची व पुन्हा तेवढीच रक्कम व्याज म्हणून एकेक वर्षाच्या अंतराने मिळत होती. त्यामुळे एका पुढारी असलेल्या एजंटाने सुरूवातीला नातेवाईक व नंतर मित्रमंडळींना गाठून त्यांच्याकडून ८६ हजारांची रक्कम घेतली. तीन समान हप्त्यात ती परतही केली होती.
संबंधित मंडळी हॉटेलमध्ये बसून पाच-पाच लाख रुपये लोकांना वाटप करायचे. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. या भागातील ६८० जणांनी गुंतवणूक केली. दुसरा एजंट तालुक्याच्या ठिकाणी राहून दोन्ही लाईनमध्ये ७५६ ग्राहक त्याच्या गळाला लागले. त्यामुळे सदर एजंटाचे मासिक कमिशन ६० हजारांच्या पुढे गेले. या दोन्ही एजंटांची कामगिरी पाहून तिसरा एजंटही ‘हम भी कुछ कम नहीं’ अशा गर्वामुळे हळदीचे कुकर भाड्याने देता देता हाही धंदा जोमात करायला लागला. त्यामुळे या एजंटाना लाखो रुपयांत खेळण्याची सवय लागली.
मागील महिन्यात केबीसी कंपनीने गाशा गुंडाळताच या एजंटांची झोप उडाली. मात्र तक्रार कुणीही दिलेली नसल्याने गुंतवणूकदारच फसले आहेत. (वार्ताहर)