शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तपास यंत्रणा बोलेना; 'नीट'चा संभ्रम थांबेना ! चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सूचना

By राजकुमार जोंधळे | Updated: June 28, 2024 19:40 IST

नीट गुणवाढीसंदर्भात पालकांकडून अडव्हाॅन्स ५० हजार आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे घेऊन काेट्यवधींची माया जमविण्याचे आराेपींचे नियाेजन हाेते.

लातूर : नीट गुणवाढीसंदर्भात अटकेत असलेला आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण आणि शिक्षक संजय जाधवची वेगवेगळ्या तपासयंत्रणांकडून सध्याला कसून केली जात आहे. मात्र, या चाैकशीतील तपशील बाहेर येत नसल्याने गत दाेन दिवसांपासून नीट प्रकरणाचा संभ्रम थांबायला तयार नाही. तपास यंत्रणा बाेलेना अन् ‘नीट’चा संभ्रम थांबताना दिसत नाही. दरम्यान, नीट प्रकरणातील चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सक्त सूचना यंत्रणेला आहेत.

नीट गुणवाढीसंदर्भात पालकांकडून अडव्हाॅन्स ५० हजार आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे घेऊन काेट्यवधींची माया जमविण्याचे आराेपींचे नियाेजन हाेते. मात्र, नीटचा निकाल नियाेजित तारखेपूर्वीच जाहीर झाल्याने त्यांचे नियाेजन काेलमडले. ज्यांच्याकडून गुणवाढीच्या कामासाठी रक्कम घेतली हाेती, ती रक्कम परत केल्याची कबुली आराेपी देत आहेत. मात्र, यावर अधिकारवाणीने तपास यंत्रणा काहीच बाेलयाला तयार नसल्याने नीट प्रकरणाचा संभ्रम अन् गुंता वाढत आहे. अटकेत असलेला मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधव याची चाैकशी नांदेड येथील एटीएस, लातूर डीवायएसपी पथक आणि स्थानिक पाेलिसांकडून केली जात आहे. तीन दिवसांपासून चाैकशीचा फेऱ्या सुरुच आहे.

नांदेडच्या एटीएस पथकाचा लातुरात दाेन दिवस मुक्काम...आराेपी संजय जाधव आणि जलील पठाण याच्या चाैकशीसाठी स्वतंत्र पाच यंत्रणा सध्या सक्रिय झाल्या आहेत. या चाैकशीतून काही तरी हाती लागेल का? यासाठी प्रत्येक यंत्रणा काम करत आहेत. यासाठी नांदेड येथील एटीएस पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही लातुरात मुक्काम ठाेकला.

अटकेतील आराेपींची ‘मॅराेथाॅन’ चाैकशी...नीट गुणवाढीसंदर्भात अटकेत असलेल्या दाेघा आराेपींची चाैकशी वेगवेळ्या यंत्रणांकडून एकापाठाेपाठ केली जात आहे. या मॅराेथाॅन चाैकशीच्या कचाट्यात अडकलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक जाधव याच्याकडून दरराेज नवनवे खुलासे हाेत असल्याचे समजते. त्यामुळे इतर आराेपींचाही पाेलिस शाेध घेत आहेत.

देगलूरमध्येही तपास पथकाने केली चाैकशी...नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मुळचा असलेला आराेपी इरण्णा काेनगलवार याच्या मागावर पथके आहेत. नांदेड, लातूर येथील पथकाने देगलूरला नजीकच्या नातेवाईकांकडे चाैकशी केल्याची माहिती समाेर आली आहे. काही दिवसांपासून इरण्णाचा देगलूरशी फारसा संपर्क नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालlaturलातूरCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागAnti Terrorist Squadएटीएस