देगावमधील बलात्कार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला
By Admin | Updated: August 11, 2014 01:54 IST2014-08-11T01:14:24+5:302014-08-11T01:54:09+5:30
अर्धापूर : तालुक्यातील देगाव (कुऱ्हाडा) येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास शासन आदेशान्वये गुन्हा अन्वेषण विभागाकडे

देगावमधील बलात्कार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला
अर्धापूर : तालुक्यातील देगाव (कुऱ्हाडा) येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास शासन आदेशान्वये गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिल्याने पिडीत महिलेला दिलासा मिळाला आहे.
१७ मे २०१४ रोजी देगाव (कुऱ्हाडा) येथे सामूहिक बलात्कार झाल्या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन गुरन ८६/१४ कलम ३७६ ड अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदरच्याच पिडीत महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. त्या प्रकरणी गुरन १९५/१३ कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झाला . पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी या प्रकरणी तपास करुन कोर्टात दोषारोप दाखल केले. नंतर काही दिवसानंतर सदर पिडीत महिलेवर पुन्हा सामुहिक बलात्कार झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली. या प्रकरणी पोलिस योग्य रितीने तपास करीत नसून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नाही या बाबत पिडीत महिलेने तक्रार केली होती.
दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर औटे यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर औटे यांनी घटना स्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली असतानाच फिर्यादीच्या मागणीनुसार सदर प्रकरणाचा तपास शासनाच्या आदेशान्वये गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केला. आता या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक सी.जी. गुंगेवाड हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)