शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरने मंजुरी दिलेल्या प्रकरणांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:11 IST

लोकमत इम्पॅक्ट: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय, अनेक निर्णय संशयास्पद

छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यास लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्या कार्यकाळातील शासकीय जमिनीची सर्वच प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी होणार आहे. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

जिल्ह्यात वर्ग-२ मध्ये असलेल्या गायरान जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याचा सपाटा लाचेच्या जाळ्यात अडकलेले निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी लावला होता. ८८च्या आसपास प्रकरणे त्यांच्या काळात मंजूर केल्याची प्राथमिक माहिती असून, याप्रकरणी ‘लोकमत’ने २८ मेच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. 

तिसगाव येथील वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यास दि. २७ मे रोजी अटक झाली. या प्रकरणात वरील दोघांनी आधी २३ लाखांची रक्कम स्वीकारली होती. नंतर आणखी १८ लाखांची मागणी करून त्यातील पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना अटक केली. यानंतर आता खिरोळकर यांच्या कार्यकाळातील वर्ग : २ च्या सर्वच जमिनींचे तसेच गायरान जमिनींची प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खिरोळकर याच्या कार्यकाळात अशा पद्धतीने ८८ प्रकरणांना मंजुरी दिली गेल्याचे वृत्त आहे.

गायरानधारकाच्या निधनानंतर परस्पर निर्णयखिरोळकर याने गायरानधारकाच्या निधनानंतर परस्पर गायरान जमीन वर्ग २ मधून १ मध्ये मंजूर केली. तसेच त्या जमिनीचे खरेदीखतदेखील शहराऐवजी सिल्लोडमध्ये करण्यात आले. याप्रकरणी ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी महसूल प्रशासनाला दि. २८ मे रोजी कायदेशीर नोटीस दिली आहे. माळीवाडा गट क्र.१९१ मधील वर्ग २ ची जमीन वर्ग: १ मध्ये करण्यात आली. खिरोळकर यांनी वस्तुस्थिती न पाहता हे प्रकरण हाताळले. जीपीएधारकाशी संगनमत करून त्यांनी निर्णय दिला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग