‘तपासाची चेकलिस्ट’ पोलिसांसह लोकांच्याही उपयोगाची -संजयकुमार

By | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:39+5:302020-11-28T04:09:39+5:30

सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रकाश मृत्याल यांच्या ‘गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते झाले. ...

‘Investigation checklist’ useful for people including police - Sanjay Kumar | ‘तपासाची चेकलिस्ट’ पोलिसांसह लोकांच्याही उपयोगाची -संजयकुमार

‘तपासाची चेकलिस्ट’ पोलिसांसह लोकांच्याही उपयोगाची -संजयकुमार

सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रकाश मृत्याल यांच्या ‘गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते झाले. माजी पोलीस महासंचालक वसंत सराफ, प्रशिक्षण विभागाचे अप्पर महासंचालक संजयकुमार हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे होते.

प्रकाश मुत्याल यांनी यापूर्वी पोलीस सेवेत असताना तपासाची चेकलिस्ट बनवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. सातारा येथे असताना १९९८ मध्ये पहिला प्रयोग त्यांनी केला. यानंतर ५ वर्षे शिक्षा झालेले व सुटलेले गुन्हेगार याचा अभ्यास करून गुन्हा दाखल झाल्यापासून तपासाच्या विविध टप्प्यांवर काय करावे याची चेकलिस्ट बनवली आहे. यापूर्वी त्यांच्या चेकलिस्टप्रमाणे तपास झाल्यामुळे शिक्षेचे प्रमाण २०% पर्यंत अधिक झाल्याचा त्यांचा अनुभव आहे.

-------------

चौकट:

१७ प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी, १ मोटार अपघात आणि १ अपघाती मृत्यूसाठीच्या तपासाची चेकलिस्ट

-----------------

‘गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट’ या पुस्तकाचा उपयोग पोलीस अंमलदारांना तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर होणार आहे. तक्रारदारांनाही याचा उपयोग होईल. आपल्या तक्रारीवर योग्य तपास झाला किंवा नाही याची खात्री त्यांना करून घेता येईल.

-संजयकुमार

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण)

--------------------

राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी १५ हजार प्रती मोफत देणार

-प्रकाश मुत्याल

निवृत्त पोलीस महानिरीक्षक

Web Title: ‘Investigation checklist’ useful for people including police - Sanjay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.