तपास अधिकारी म्हणतात, ते प्रकरण घरगुती आहे...!

By Admin | Updated: June 27, 2017 00:37 IST2017-06-27T00:34:41+5:302017-06-27T00:37:19+5:30

बीड : घटनेतील एकाही आरोपीला अटक झाली नाही. पत्नी व पतीच्या वादातून हा प्रकार झाला आहे, असे सांगून तपास अधिकारी आर.एस.सानप यांनी फोन बंद केला

The investigating officer says that the matter is domestic ...! | तपास अधिकारी म्हणतात, ते प्रकरण घरगुती आहे...!

तपास अधिकारी म्हणतात, ते प्रकरण घरगुती आहे...!

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घटनेतील एकाही आरोपीला अटक झाली नाही. पत्नी व पतीच्या वादातून हा प्रकार झाला आहे, असे सांगून तपास अधिकारी आर.एस.सानप यांनी फोन बंद केला. घटना गंभीर असतानाही पोलिसांकडून त्याला ‘सहज’ घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. नेमलेली दोन्ही पथके केवळ ‘दौरे’ करून रिकाम्या हाताने परतत आहेत.
माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे कुंदन वानखेडे या निर्दयी पित्याने बलभीम व वैष्णव या दोन चिमुकल्यांना जाळून मारले होते. यामध्ये कुंदनसह पाच जणांविरूद्ध दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती एकही आरोपी लागलेला नाही. पोलिसांनी नेमलेली पथके केवळ नावालाच आहेत. तर तपास अधिकारी हे प्रकरण घरगुती कारणातून झाल्याचे सांगत आहेत. प्रकरण जरी घरगुती कारणावरून झाले असले तरी त्यांनी गुन्हा केला आहे. आणि केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आरोपींना मिळालीच पाहिजे. परंतु पोलिसांकडून या प्रकरणाला फारसे गांभीर्याने हाताळले जात नाही.

Web Title: The investigating officer says that the matter is domestic ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.