शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नवीन पाणीपुरवठा योजनेतील गैरकारभाराची चौकशी करा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:29 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या आर्थिक गैरकारभारासंदर्भात चव्हाण यांनी दि. २६ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना पत्र दिले.

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असून, या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने तातडीने चौकशी समिती नेमावी, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडे केली आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या आर्थिक गैरकारभारासंदर्भात चव्हाण यांनी दि. २६ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजना वर्ष २०१९ मध्ये मंजूर करण्यात आली होती. काम वेळेत पूर्ण करून शहराला आवश्यक पाणीपुरवठा केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजही नागरिकांना १० ते १२ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन २ वर्षे लागतील, असे सांगितले जात आहे.

यंत्रसामग्री खरेदीत गैरव्यवहारनवीन पाणीपुरवठा योजनेत जीव्हीपीआर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नियोजनात नसलेल्या आणि जीव्हीपीआर कंपनीशी संलग्न असलेल्या आणखीन एका दुसऱ्या कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री, पम्पिंग मशिनरी खरेदी करण्यात आली. बाजारात यापेक्षा दर्जेदार कंपन्यांची यंत्रसामग्री असताना, निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे.

तांत्रिक निकष, गुणवत्ता धाब्यावरशहरात ५३ पाण्याच्या टाक्या उभ्या करायच्या होत्या. कंपनीकडून आजपर्यंत त्या उभारण्यात आलेल्या नाहीत. शहरात १८०० किलोमीटर जलवाहिन्या टाकायचे ठरले होते, त्यातील ५० टक्के सुद्धा काम पूर्ण झालेले नाही. जायकवाडी धरणात जॅकवेल उभारणीच्या कामात हलगर्जीपणा करण्यात येत असून, तांत्रिक निकष आणि गुणवत्ता धाब्यावर बसविण्यात आली आहे.

एअर व्हॉल्व्ह बसविण्याची पद्धत चुकीचीजलवाहिनी टाकताना चुकीच्या पद्धतीने एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेतील संपूर्ण गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने तातडीने चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका