पळसखेडा येथील घटनेची चौकशी करा
By | Updated: November 22, 2020 09:01 IST2020-11-22T09:01:41+5:302020-11-22T09:01:41+5:30
पळसखेडा पिंपळे (ता. भोकरदन, जि. जालना) येथे १८ नोव्हेंबरला तीन भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्रसारमाध्यमांनी ...

पळसखेडा येथील घटनेची चौकशी करा
पळसखेडा पिंपळे (ता. भोकरदन, जि. जालना) येथे १८ नोव्हेंबरला तीन भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. त्याची दखल घेऊन या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करावी, तसेच चौकशीच्या निष्कर्षानुसार कुणी दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही डॉ. राऊत यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे महावितरणकडून कळवण्यात आले.