आविष्कार बहुद्देशीय शिक्षण मंडळातर्फे स्वराविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST2021-07-14T04:05:42+5:302021-07-14T04:05:42+5:30
मंडळातर्फे स्वराविष्कार औरंगाबाद : ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या ग्रुपतर्फे सुगम गायनाच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. आविष्कार बहुद्देशीय शिक्षण ...

आविष्कार बहुद्देशीय शिक्षण मंडळातर्फे स्वराविष्कार
मंडळातर्फे स्वराविष्कार
औरंगाबाद : ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या ग्रुपतर्फे सुगम गायनाच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. आविष्कार बहुद्देशीय शिक्षण मंडळ संचालित स्वराविष्कारासाठी ऑनलाइन घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना संस्थेतर्फे प्रारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
पहिला ग्रुप २० वर्षांआतील कलाकारांसाठी होता. त्यात ओवी शेरे प्रथम, मिहिका जोशी द्वितीय, उत्तेजनार्थ सानिरा भदाणे, दुसरा ग्रुप २० ते ५० वयोगटात महिलांमधून प्रथम प्राजक्ता मांडे, द्वितीय आरती काशीद, उत्तेजनार्थ श्रद्धा मांडे, तिसरा ग्रुप २० ते ५० पुरुषांचा होता. त्यात प्रमम प्रियदर्शक पुराणिक, चौथा ग्रुप ५० च्या पुढील वयोगटासाठी होता. त्यात प्रमुख रत्नमाला टेकमल, द्वितीय शारदा दाते तृतीय क्रमांक सुमन लोणकर, उत्तेजनार्थ पुष्पलता चांदोरकर यांना ग्रुपनुसार पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. परीक्षण म्हणून आविष्कारचे अध्यक्ष मथुरादास व्ही. देशमुख, गायिका वैशाली कुरतडीकर यांनी काम पाहिले. निवेदिका अनुया जोयशी यांनी बहारदार निवेदन केले.