कुंडलिका नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:54 IST2017-08-08T00:54:59+5:302017-08-08T00:54:59+5:30
कुंडलिका नदीपात्रास स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने गाजावाजा करत खोलीकरण मोहीम हाती घेतली आहे, तर दुसरीकडे शहर हद्दीतून वाहणाºया याच नदीच्या पात्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे.

कुंडलिका नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातून वाहणाºया कुंडलिका नदीपात्रास स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने गाजावाजा करत खोलीकरण मोहीम हाती घेतली आहे, तर दुसरीकडे शहर हद्दीतून वाहणाºया याच नदीच्या पात्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. मात्र, प्रशासन यापासून अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून नदीपात्राचे खोलीकरण सुरू असताना लक्कडकोट भागाच्यावरील बाजूस कुंडलिका पात्रातून अवैध वाळू उपसा केला जात आहे. गर्द काटेरी झुडपांमुळे या भागात कोणी जात नसल्याचा फायदा वाळू चोरटे घेत आहेत. वाळूचा उपसा होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाळूची वाहतुक ट्रॅक्टरमधून केली जात आहे. वाळु चाळण्यासाठी वापरल्या जाणाºया चाळण्या, उपसा केल्यानंतर पडणारे खड्डे, चारचाकी वाहनांमुळे तयार झालेला रस्ता नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची साक्ष देतो. अनेक दिवसांपासून नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. रॉयल्टीच्या पावत्या नसताना दिवसाढवळ्या जालना- औरंगाबाद रस्त्यावर ट्रक्टरमधून वाळूची वाहतूकक केली जात आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास कुंडलिका नदीपात्राचे मुळ अस्तित्त्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणाºयांवर तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे.
दरम्यान, कुंडलिका नदी शहरातून सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहते. सीना नदीची लांबी मोठी आहे. गत काही वर्षांमध्ये नदीपात्रामध्ये अतिक्रमण वाढत आहे. शहरातील नदीपात्रालगत प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याने नदीपात्र अस्वच्छ झाले आहे. नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी कधी नव्हे ते प्रशासनाने कुंडलिका नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे. सतरा दिवसांमध्ये अकरा पोकलेन मशीनच्या मदतीने लोखंडी पुल ते राजमहल टॉकीजपर्यंत खोलीकरण करण्यात आल. दरम्यान, खोलीकरणाचे काम सोमवारी बंद असल्याचे दिसून आले.