अवैध वाळू उपसा सुरूच

By Admin | Updated: November 28, 2014 01:10 IST2014-11-27T23:56:38+5:302014-11-28T01:10:11+5:30

तळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे ४३ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव झाला आहे. लिलावधारकांनी तलाठ्यांच्या उपस्थितीत वाळू वाहतुकीची परवानगी देण्यात यावी

Invalid sand extraction | अवैध वाळू उपसा सुरूच

अवैध वाळू उपसा सुरूच


तळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे ४३ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव झाला आहे. लिलावधारकांनी तलाठ्यांच्या उपस्थितीत वाळू वाहतुकीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सरपंचासह उपसरपंचाने निवेदनाद्वारे केली आहे.
टाक ळखोपा येथून अवैध उपसा व साठा क रु न वाहतूक होत आहे. जप्त केलेल्या ४३ ब्रास वाळूचा लिलाव तहसीलने १ नोव्हेंबर रोजी के ला. सदर साठ्यात वाळू माफि यांनी भर घातली आहे. त्यामुळे लिलावधारकांना तलाठ्याचा उपस्थित वाहतुकीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सरपंच विष्णू चाटे व उपसरपंच प्रदीप चाटे यांनी दि. २४ रोजी जिल्हाधिक ारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी सासखेडा येथे २२५ ब्रास वाळू लिलाव केला होता. लिलावधारक ांना १७ ते २१ नोव्हेंबर पर्यंत वेळ व ठराविक वाहन व पावत्या दिला होत्या. मात्र, संबंधित गुत्तेदाराने अवैधरित्याही वाळूचा उपसा व साठा करुन हजारो ब्रास वाळू विक्र ी के ली होती. टाक ळखोपा येथे ४३ ब्रास वाळू उचलण्याठी परवागणी देण्यात येणार आहे. यात दीडशे ब्रास वाळूची भर पडली. (वार्ताहर)४
पूर्णा पाटी येथे वाळू वाहतुक ीसाठी क रण्यात आलेला रस्ता बंद क रण्यात आला आहे. ही क ारवाई तलाठी एस.एस.कु लक र्णी यांनी के ली आहे. मात्र, सासखेडा, देवठाणा-उस्वद व टाक ळखोपा येथील रस्ते मोक ाट असून चोरटी वाहतूक होत आहे.
४उस्वद व क ानडी येथील ग्रामस्थांनी वाळू पट्याचा लिलावास विरोध के ल्याने २७ नोव्हेबर रोजी उपविभागीय अधिक ारी लोखंडे भेट दिली. यानंतरही दोन्ही गावातील ग्रामस्थांचा लिलावास विरोध कायम आहे.

Web Title: Invalid sand extraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.