आसरडोह योजनेचा चौकशी अहवाल सादर
By Admin | Updated: August 15, 2014 01:35 IST2014-08-15T01:19:54+5:302014-08-15T01:35:49+5:30
बीड : धारूर तालुक्यातील आसरडोह येथील वीसगाव आठरा तांडे पाणीपुरवठा योजनेचा चौकशी अहवाल बुधवारी जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवांकडे सादर झाला आहे.

आसरडोह योजनेचा चौकशी अहवाल सादर
बीड : धारूर तालुक्यातील आसरडोह येथील वीसगाव आठरा तांडे पाणीपुरवठा योजनेचा चौकशी अहवाल बुधवारी जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवांकडे सादर झाला आहे. चौकशीत अनियमितता आढळून आली असून कारवाईकडे लक्ष वेधले आहे.
आसरडोह येथे २२ कोटी रुपये खर्च करुन प्रादेशिक पाणी योजना राबविण्यात आली होती; परंतु योजनेचे काम निकृष्ट झाल्याने योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकली नाही. आजही परिसरातील गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेच्या कामातील अनियमिततेच्या चौकशीची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता पथकाचे अधीक्षक अभियंता के. डी. खोसे यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने वर्षभरापूर्वी चौकशी केली होती. त्याचा अहवाल मात्र सादर केला नव्हता. अखेर हा अहवाल सदस्य सचिव सोनिया सेठी यांच्यापुढे गेला आहे.
या चौकशी अहवालात अनियमिता आढळल्याचे नमूद असून दोषींवर कारवाईची शिफारस केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नंतर फोन करा
गुणवत्ता नियंत्रणचे अधीक्षक अभियंता के. डी. खोसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, अहवाल सादर केला आहे; पण अहवालात काय आहे? हे जाणून घ्यायचे असेल तर शनिवारी फोन करा. मला आता वेळ नाही असे सांगून त्यांनी फोन ठेवला. (प्रतिनिधी)