शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत वडिलांचा गळा दाबला,तिघा भावांनी मिळून त्याचा जीव घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:38 IST

सिडको पोलिसांनी संशयित चार आरोपींना अटक केली आहे

औरंगाबाद : दारूच्या नशेत शिवीगाळ करीत वडिलांचा गळा दाबणाऱ्याचा  भावांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता मिसारवाडी येथे घडली. याविषयी माहिती मिळताच सिडको पोलिसांनी झटपट कारवाई करीत चार संशयितांना अटक केली. सुनील प्रभुदास पारधे, मनोज प्रभुदास पारधे, सागर प्रभुदास पारधे आणि प्रभुदास पारधे (सर्व रा. मिसारवाडी, गल्ली क्रमांक १) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रभुदास हा अन्य आरोपींचा पिता आहे. या घटनेत सलीम शहा मुस्तफा शहा (३०) यांचा खून झाला.

सिडको पोलिसांनी सांगितले की, या सर्वांची घरे मिसारवाडी येथील एकाच गल्लीत शेजारी आहेत. सलीमला दारूचे व्यसन असल्याने तो नशेत गल्लीतील लोकांना शिवीगाळ करीत असे. चार दिवसांपूर्वी त्याने प्रभुदास यांना शिवीगाळ केली होती. याकडे प्रभुदास यांच्या मुलांनी दुर्लक्ष केले होते. काल मात्र सलीम प्रभुदासच्या अंगावर धावून गेला आणि त्याने त्यांचा गळा दाबला. हे भांडण आजूबाजूच्यांनी सोडविले होते. ही बाब मुलांना समजल्याने ते त्याला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा सलीम पत्नीसोबत ओट्यावर गप्पा मारीत होता. 

आरोपींनी त्याला बोलावून घरापासून जवळच असलेल्या संघर्ष चौकात ओढत नेले. तेथे त्याला चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व तो बेशुद्ध पडल्यावर आरोपी पळून गेले. याविषयी माहिती मिळताच सलीमचे भाऊ नाझिम मुस्तफा शहा (वय २८, रा. मिसारवाडी) यांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत एमजीएम हॉस्पिटलला नेले. तेथील डॉक्टरांनी सलीमला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी पवार आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ एमजीएम आणि घटनास्थळी धाव घेतली. नाझिम शहा यांची फिर्याद नोंदवून घेत आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविला.

झटपट कारवाई; आरोपींना अटकपोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर झटपट कारवाई करत पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.  

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद