आरक्षण लांबल्याने धाकधूक

By Admin | Updated: March 27, 2015 00:21 IST2015-03-27T00:21:22+5:302015-03-27T00:21:22+5:30

मधुकर सिरसट , केज येथील नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने भाजप-सेनेचा सफाया करीत विजयाची गुढी उभारली. मात्र, निवडणूक जिंकूनही आरक्षणाअभावी सत्ताकेंद्र काँग्रेसच्या ‘हाता’बाहेर गेले आहे.

Intimidation of reservation | आरक्षण लांबल्याने धाकधूक

आरक्षण लांबल्याने धाकधूक


मधुकर सिरसट , केज
येथील नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने भाजप-सेनेचा सफाया करीत विजयाची गुढी उभारली. मात्र, निवडणूक जिंकूनही आरक्षणाअभावी सत्ताकेंद्र काँग्रेसच्या ‘हाता’बाहेर गेले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
१७ सदस्यीय नगर पंचायतीत १८ जानेवारी २०१५ रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक ८ जागा जिंकून काँग्रेसने वर्चस्व सिध्द केले आहे. भाजपाला ५ जागांवर समाधान मानावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ शिलेदार निवडून आले आहेत. दोन अपक्षांनी विजयाचा गुलाल लावला आहे. सत्ता काबीज करण्यासाठी काँगे्रसला केवळ एका नगरसेवकाच्या मदतीची गरज आहे. काँग्रेसने नगर पंचायतीवर दावा करीत हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, आरक्षणाअभावी सत्तेची फळे चाखणे कठीण झाले आहे. त्यामुळे इच्छूक ‘गॅस’वर आहेत.
काय होऊ शकते ?
नगर पंचायत निवडणुकीत भाजपाला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. भाजपाच्या मातब्बर उमेदवारांना हादरे बसले. भाजपचा एक गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. उपनगराध्यक्षपद पदरात पाडून काँग्रेसला बाहेरून टेकू दिला जाऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

Web Title: Intimidation of reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.