शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

दुपारपर्यंतच आटोपल्या कॉंग्रेसच्या विधानसभेसाठीच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 8:16 PM

औरंगाबाद पश्चिम व पूर्व वगळता अन्य मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या मोठी नव्हतीच.

ठळक मुद्दे गांधी भवनात काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणीदोन-तीन मिनिटांतच मुलाखत देऊन उमेदवार बाहेर पडत होते. मोजकेच प्रश्न विचारले जात होते. त्यामुळेही मुलाखतींचा वेळ वाढत गेला नाही. 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे गांधी भवनात घेण्यात आलेल्या मतदारसंघनिहाय मुलाखती दुपारपर्यंत संपून गेल्या होत्या. औरंगाबाद पश्चिम व पूर्व वगळता अन्य मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या मोठी नव्हतीच. त्यामुळेही मुलाखती लवकर संपल्या. शिवाय शक्तिप्रदर्शनाला वाव नव्हता. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वत: उपस्थित राहावे, समर्थकांना सोबत आणू नये, असे कळविण्यात आले होते. त्यामुळेही गांधी भवनात अनावश्यक गर्दी नव्हती, तसेच दोन-तीन मिनिटांतच मुलाखत देऊन उमेदवार बाहेर पडत होते. मोजकेच प्रश्न विचारले जात होते. त्यामुळेही मुलाखतींचा वेळ वाढत गेला नाही. 

‘प्रचंड उत्साह आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आहे. विधानसभा निवडणुकीला काँग्रेस पक्ष सहर्ष सामोरा जाईल, असा विश्वास यानिमित्ताने निरीक्षक सचिन सावंत यांनी व्यक्त केला.मतदारसंघनिहाय वेळ ठरवून देण्यात आलेली होती. औरंगाबाद पूर्वपासून मुलाखती सुरू झाल्या. पश्चिम, मध्य मतदारसंघापर्यंतच्या मुलाखती संपल्यानंतर ग्रामीण भागातील  मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या मोठी नसल्यामुळे जे उमेदवार तेथे आले होते, त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

सचिन सावंत, कमल व्यवहारे या निरीक्षकांसह जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, केशवराव औताडे, अशोक सायन्ना, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, डॉ. जितेंद्र देहाडे, जयप्रकाश नारनवरे, रवी काळे, विलास औताडे, मुजफ्फर खान पठाण, यांच्यासह फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांची नावे अशी- औरंगाबाद पूर्व- मोहसीन अहमद, जीएसए अन्सारी, इब्राहिम पठाण, अहमद हुसेन, डॉ. सरताज पठाण, अशोक जगताप, सलीम अहमद खान, अफसर खान, युसूफ मुकाती.- औरंगाबाद मध्य- युसूफ खान, मोहंमद अय्युब खान, मो. हिशाम उस्मानी, मसरूर खान, सागर मुगदिया. - औरंगाबाद पश्चिम : डॉ. जितेंद्र देहाडे, साहेबराव बनकर, प्रदीप शिंदे, चंद्रभान पारखे, सचिन शिरसाठ, पंकजा माने, जयप्रकाश नारनवरे, राणुजी जाधव, सुनीता तायडे, तानाजी तायडे, एकनाथ त्रिभुवन, सुनीता कांबळे. - पैठण- अनिल पटेल, विनोद तांबे, भाऊसाहेब भोसले, शेख तय्यब. - गंगापूर- किरण पा. डोणगावकर, सय्यद कलीम, संजय जाधव, जगन्नाथ खोसरे. - वैजापूर- पंकज ठोंबरे, प्रशांत सदाफळ. - सिल्लोड- प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन, कैसर आझाद, राजेश मानकर, भास्कर घायवट, सुनील काकडे. - फुलंब्री- डॉ. कल्याण काळे, ताराबाई उकिर्डे, अनिल मानकापे पाटील. - कन्नड- नामदेवराव पवार, संतोष कोल्हे, नितीन पाटील, अनिल सोनवणे, अशोक मगर, बाबासाहेब मोहिते.

अनेक इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी आलेले दिसले नाहीत. डॉ. कल्याण काळे हे निरीक्षक म्हणून अन्य जिल्ह्यांत गेले असल्याने ते मुलाखतीसाठी आले नव्हते. 

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद