निकाल जाहीर करून पात्र असल्यास मुलाखतीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST2021-04-08T04:05:21+5:302021-04-08T04:05:21+5:30
औरंगाबाद : लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या मुदतीत पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने राखून ठेवलेला दोघा उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा ...

निकाल जाहीर करून पात्र असल्यास मुलाखतीची
औरंगाबाद : लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या मुदतीत पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने राखून ठेवलेला दोघा उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करून ते पात्र असल्यास त्यांना मुलाखतीची संधी द्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी लोकसेवा आयोगास दिला आहे.
नितीशा संजय जगताप आणि वैभव सुभाषराव बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करून मुख्य परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आणि मुख्य परीक्षाही घेण्यात आली.
कोविडमुळे संबंधितांची अंतिम वर्षाची परीक्षा एप्रिल २०२० ऐवजी ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आली. निकाल ३ डिसेंबर २०२० रोजी लागला.
मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२० होती. तत्पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य होते; परंतु निकाल ३ डिसेंबर २०२० रोजी लागल्याने संबंधित उमेदवार विहित मुदतीत पदवीचे प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत. मुख्य परीक्षा ८ ते १७ जानेवारी २०२१ या कालावधीत पार पडली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला; परंतु वरील दोघांचा निकाल जाहीर केला नाही. मुलाखतीसाठी कागदपत्रे सादर करण्याची ५ एप्रिल २०२१ शेवटची तारीख होती. दोघांनी रविभूषण आडगावकर व ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. केंद्रातर्फे ॲड. आर. आर. बांगर यांनी काम पाहिले.
..................................