वरपूडकरांनी पाथरीतून दिली मुलाखत

By Admin | Updated: August 26, 2014 23:54 IST2014-08-26T23:36:20+5:302014-08-26T23:54:38+5:30

परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुंबई येथे मंगळवारी मुलाखती घेण्यात आल्या.

Interview with the classmates | वरपूडकरांनी पाथरीतून दिली मुलाखत

वरपूडकरांनी पाथरीतून दिली मुलाखत

परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुंबई येथे मंगळवारी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी अनपेक्षितपणे माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून मुलाखत दिल्याने दोन्ही इच्छूक उमेदवार चांगलेच चकित झाले.
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ जणांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व अन्य वरिष्ठ नेत्यांच्यासमोर मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघातून राजेश विटेकर व चक्रधर उगले यांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनीही या मतदारसंघातून मुलाखत दिल्याने विटेकर व उगले चांगलेच चकित झाले.
विशेष म्हणजे वरपूडकर यांनी पक्षाकडे या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. परभणी विधानसभा मतदारसंघातून आ.बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जुलाला, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, बाळासाहेब जामकर आदी ११ जणांनी मुलाखती दिल्या. गंगाखेडमधूनही चौघांनी तर जिंतूरमधून विजय भांबळे यांनी मुलाखत दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
फौजिया खान यांचा कळमनुरीतून अर्ज
आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या नावाने कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचा अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आला. या संदर्भात आवश्यक त्या शुुल्काची पावतीही फाडण्यात आली असल्याचे हिंगोली येथील राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. परंतु, फौजिया खान यांनी मंगळवारी मुलाखत मात्र कळमनुरीतून दिली नसल्याचे समजते. त्यांनी औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून मुलाखत दिली असल्याचीही चर्चा होती.

Web Title: Interview with the classmates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.