दोन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद
By Admin | Updated: July 4, 2016 00:31 IST2016-07-03T23:54:11+5:302016-07-04T00:31:20+5:30
धारूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुंडलिका योजनेच्या जलवाहिनीचे काम करीत असताना बीएसएनएलचे मुख्य वायर तुटल्याने दोन दिवसांपासून इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे.

दोन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद
धारूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुंडलिका योजनेच्या जलवाहिनीचे काम करीत असताना बीएसएनएलचे मुख्य वायर तुटल्याने दोन दिवसांपासून इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जलवाहिनीचे काम करताना शुक्रवारी सायंकाळी बीएसएनएलचे वायर तुटले. यामुळे इंटरनेट, मोबाईल, एटीएम या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. परिणामी दैनंदिन व्यवहारावर विपरित परिणाम झाला असल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधून वायर जोडण्याविषयी मागणी करण्यात आली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
बीएसएनएल सेवा सतत कोलमडलेली असते. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असा आरोप येथील नागरिक अशोक तिडके यांनी केला.
याबाबत अभियंता कुलकर्णी म्हणाले की, तुटलेली वायर तात्काळ जोडण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व सेवा सुरळीत होण्यास मदत होईल. (वार्ताहर)