शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

लहानशी टपरी ते हायफाय आऊटलेट; घोटभर घेताच तरतरी देणाऱ्या कपभर चहाचा देखणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:54 IST

International Tea Day : युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे

ठळक मुद्देभारतासह काही देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. वाळूज, चिकलठाणा, औरंगाबाद शहर या भागात एकत्रितपणे महिन्याला तब्बल ३० टन चहाची विक्री होते.

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : कामानिमित्त बाहेर पडल्यावर चहाची तलफ लागली की, हमखास चहाची टपरी आठवायची. आता मात्र गरिबांच्या या अमृतामध्येही आमूलाग्र बदल झाला असून, लहानशी टपरी ते हायफाय आऊटलेट, असा देखणा प्रवास कपभर चहाने केला आहे.  युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे; परंतु चहाचे उत्पादन आणि खप सर्वाधिक असणाऱ्या भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनशिया,  बांगलादेश, केनिया,  मलेशिया, युगांडा, टान्झानिया, मालवी या देशांमध्ये, तसेच नेदरलँड, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. चहा उत्पादक आणि व्यापारी यांच्याकडे जगाचे लक्ष वेधले जावे आणि चहाला योग्य भाव मिळून त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, या उद्देशाने चहा दिवस साजरा केला जातो.

औरंगाबाद शहरात आजघडीला २५० च्या आसपास चहाच्या टपऱ्या असून, जवळपास प्रत्येक हॉटेलमध्येच चहा मिळतो. फक्त चहाच्या टपऱ्यांमध्ये होणारी मासिक आर्थिक उलाढाल ही काही लाखांच्या घरात आहे. मागील ५ वर्षांत चहा विक्रीचा ट्रेण्डही बदलला असून, आता चहाची चकाचक आऊटलेट ग्राहकांना आकर्षित  करीत आहेत. सद्य:स्थितीत औरंगाबादमध्ये विविध ब्रँडच्या कंपन्यांची १० पेक्षाही अधिक आऊटलेट आहेत. पूर्वी अत्यंत कमी पैसा गुंतवून चहाची टपरी सुरू केली  जायची. आता मात्र चहाच्या आऊटलेटला मोठे ग्लॅमर मिळाले असून, एक आऊटलेट सुरू करण्यासाठी  लाखो रुपये गुंतवावे लागतात. 

औरंगाबादकर पितात महिन्याला ३० टन चहावाळूज, चिकलठाणा, औरंगाबाद शहर या भागात एकत्रितपणे महिन्याला तब्बल ३० टन चहाची विक्री होते. कोरोना काळात एकीकडे अद्रक, सुंठ, दालचिनी टाकून चहा पिण्याला महत्त्व आले होते, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे चहाचे उत्पादन थांबले होते. त्यामुळे मे नंतर चहाचे भाव १०० ते १५० रुपये वाढले. चहामध्ये एवढी विक्रमी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे व्यापारी अशोक रुणवाल यांनी सांगितले. मार्चपासून चहाची मागणी जवळपास ३० टक्क्यांनी वाढली आहे. चहाच्या विविध प्रकारांमध्ये चॉकलेट फ्लेव्हरच्या चहाला सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल इलायची फ्लेव्हर विकला जातो. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न