अंतर्गत गटारी तुडुंब !

By Admin | Updated: June 21, 2014 00:53 IST2014-06-21T00:18:10+5:302014-06-21T00:53:21+5:30

लातूर : पावसाच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने महिनाभरापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

Internal Gutter Trouble! | अंतर्गत गटारी तुडुंब !

अंतर्गत गटारी तुडुंब !

लातूर : पावसाच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने महिनाभरापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहराच्या चारही भागांतील गटारींचे पाणी कसल्याही परिस्थितीत अडणार नाही, याची काळजी घेत स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसाचे पाणी ज्या गल्लीतून, नाल्यांतून मोठ्या नाल्यांना मिळणार आहे, अशाप्रकारच्या गल्लीतील नाल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होईल की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
लातूर शहरात पावसाळापूर्व कामे हाती घेण्यासंदर्भात महिनाभरापूर्वी आयुक्तांनी स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार गटारी व मोठे नाले मोकळे करण्यासाठी चार जेसीबी यंत्राच्या सहाय्याने महिनाभरापासून काम सुरू आहे. मनपा प्रशासनाच्या अजेंड्यावर असलेल्या बहुतांश गटारींचे काम पूर्ण झाल्याचा दावा स्वच्छता निरीक्षकांनी केला आहे. अजूनही काही भागांतील कामे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यंत्राच्या सहाय्याने मोठ्या गटारी काढण्यात आल्या असल्या तरी अंतर्गत गटारी मात्र अजूनही कचरा व मातीने तुंबल्या आहेत. बारमाही स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी गटारीतून पाणी पुढे जावे एवढीच सफाई करतात. त्यामुळे साचलेला कचरा व इतर साहित्य नाल्यांमध्ये तसेच पडून आहे. साळे गल्ली येथील शहावली चौकातील अंतर्गत गटारी भरलेल्या आहेत. तसेच खोरी गल्ली, पाच नंबर चौकानजिक असलेल्या भाग्य नगर, चौधरी नगर, खाडगाव रोडवरील सदाशिव नगर, नांदेड रोडवरील बौद्ध नगर, म्हैसूर कॉलनी, अंजली नगर, सिद्धार्थ सोसायटी, टिळक नगर, हत्ते नगर, शिवाजी चौक ते गांधी चौक मार्गावरील मुख्य नाली आदी ठिकाणच्या गटारी तुडूंब आहेत. (प्रतिनिधी)
चार जेसीबी यंत्राद्वारे स्वच्छता...
डी झोनमध्ये भूषण सोसायटी, सिद्धेश्वर नगरमधील मंदिरापर्यंतचा नाला, म्हैसूर कॉलनी, साळे गल्ली ते ताजोद्दीनबाबा, सिद्धेश्वर चौक ते ताजोद्दीनबाबा, रत्नापूर चौक ते सिद्धेश्वर चौक, नांदगाव वेसवरील नाला, पडिले यांच्या शेतातील नाला, मयूरबन सोसायटी, व्यंकटेश नगरातील नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली़
बी झोनमधील कामे...
चार नंबर शाळा ते बौद्ध गार्डन, समता नगरमधील नाला, पशुपतीनाथ नगर ते लमाण तांडा, राजीव गांधी चौक ते शिवाजी चौक, अयोध्या कॉलनी ते रामगिरी नगर, सिद्धेश्वर नगरातील नाला, स्क्रॅप मार्केट ते कोल्हे नगर, इस्लामपुरा, सिद्धेश्वर नगर येथील मोठे नालेही काढण्यात आले आहेत. इस्लामपुरा व सिद्धेश्वर नगरात मोठ्या पोकलेनच्या सहाय्याने गटारी स्वच्छ करण्यात आल्या.
‘सी’ झोनची कामे
सम्राट चौक ते कोयना नगर सबस्टेशन, श्रीनगर ते गोरक्षण, महादेव नगरातील मेन रोड, गरुड चौक ते एसओएस बालग्राम, सारोळा रोडवरील नाला स्वच्छ करण्यात आला आहे. शिवाय, अंतर्गत गटारी स्वच्छतेचे काम अजूनही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Internal Gutter Trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.