मध्यवर्ती बँक संगणकीकृत
By Admin | Updated: August 6, 2014 02:17 IST2014-08-06T01:49:49+5:302014-08-06T02:17:45+5:30
नांदेड: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच ६९ शाखा संगणकीकृत झाल्या असून कोअर प्रणालीद्वारे व्यवहार सुरु झाले आहेत. याशिवाय

मध्यवर्ती बँक संगणकीकृत
नांदेड: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच ६९ शाखा संगणकीकृत झाल्या असून कोअर प्रणालीद्वारे व्यवहार सुरु झाले आहेत. याशिवाय आरटीजीएस, एनईएफटी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येत असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. एस. कदम यांनी दिली.
सहकार आयुक्त व निबंंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी बँकेचे तत्त्कालीन संचालक मंडळ १९ मार्च २००५ रोजी निष्प्रभावित करुन बँकेवर प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे बँकींग व्यवसाय करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेकडून १ मार्च २०१२ रोजी परवाना मिळाला. तर ७ जानेवारी २०१३ रोजी बँकेवरील रिझर्व बँकेचे अर्थिक निर्बंध पूर्णपणे उठले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भागभांडवल ५०.२३ कोटी असून ३१६ कोटींची जमा ठेव झाली आहे. यावरुन बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिसते.
या सुविधेमुळे कोणत्याही शाखेतील खातेदारास कुठल्याही शहरातील शाखेमधून व्यवहार करता येत आहे. आरटीजीएस , एनईएफटी या सुविधामुळे मध्यवर्ती बँकेतून इतर कोणत्याही बँकेत रक्कम वर्ग करता येते. ग्रामीण भागातील शेतकरी, सभासद संस्था, ग्राहक व ठेविदारांना बँकेच्या माध्यमातून तत्पर सेवा मिळत आहे. नाबार्डकडून राबविण्यात येणाऱ्या कोअर बँकिंग प्रणालीचा स्विकार करुन बँकेने जिल्ह्यातील गारपीटग्रस्त १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना शासनाकडून प्राप्त अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहे.
गत सात वर्षांत बँकेने चागंली प्रगती केलेली आहे. मार्च २००७ मध्ये ग्रॉस एनपीए (अनुत्पादित कर्ज) ५६२.७० कोटी होते, तर मार्च २०१४ मध्ये २०३ कोटीवर आले आहे. याचे टक्केवारीचे प्रमाण ८७.९५ टक्क्यांवरुन ३५.७९ टक्क्यांवर आले. नेट एनपीए ७८.९५ वरुन ० टक्यावर आला. एनपीएसाठी २००७ मध्ये २७४.३७ कोटीची तरतूद केली होती तर आज २२२.९८ कोटी आहे.
२००७ मध्ये निव्वळ नक्त मूल्य नेटवर्थ वजा ३२५.७२ कोटी होते.तर सध्या प्लस २५.६५ कोटी झाले आहे. भांडवल पर्याप्तता निधीचे प्रमाण मायनस ८६.१७ टक्यावरुन प्लस ८.१४ टक्यावर आले. तर थकबाकीचे प्रमाण ५५२.१७ कोटीवरुन २१९.१४ कोटीवर आले आहे. संचित तोटे ३६९.४० कोटीवरुन १३९.६० कोटींवर आले आहेत. (प्रतिनिधी)