इच्छुकांत चुरस..!
By Admin | Updated: March 4, 2017 00:31 IST2017-03-04T00:29:41+5:302017-03-04T00:31:03+5:30
उस्मानाबाद : सर्वाधिक चोवीस सदस्य संख्या असलेल्या उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी सुटले आहे.

इच्छुकांत चुरस..!
उस्मानाबाद : सर्वाधिक चोवीस सदस्य संख्या असलेल्या उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी सुटले आहे. २४ पैकी तब्बल सोळा जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमत मिळविले आहे. त्यामुळे सभापती तसेच उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार विराजमान होणार, हे निश्चित आहे. दरम्यान, ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांनी सभापती पदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी तगडी फिल्डींग लावली आहे.
यामध्ये बेंबळी गणातून विजयी झालेले बालाजी गावडे आणि पळसप मतदार संघातून विजय संपादन केलेले विराज पाटील या दोघांमध्ये सध्या जोरदार चुरस आहे. या दोन्ही इच्छुकांकडून आपापल्या परीने फिल्डींग लावगल्याचे पहावयास मिळते. त्याचप्रमाणे रूईभर मतदार संघातील शोभा गोरे, समुद्रवाणी गणातील सुवर्णा इरकटे आणि करजखेडा मतदार संघातून विजयी झालेल्या प्रणिता क्षीरसागर यांचीही नावे सध्या चर्चेत आहेत.
असे असले तरी उपरोक्त इच्छुकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक श्रेष्ठींकडून कोणाला संधी दिले जाते, हे १४ मार्च रोजीच समोर येणार आहे. (प्रतिनिधी)