जपानमध्ये मार्केटिंग करणे हिताचे

By Admin | Updated: December 9, 2014 01:01 IST2014-12-09T00:50:57+5:302014-12-09T01:01:50+5:30

औरंगाबाद : जपानमधील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करायची असल्यास ते सर्वात अगोदर पोषक वातावरण, सोयीसुविधा आदी मुद्यांचा विचार करणार.

Interest in marketing in Japan | जपानमध्ये मार्केटिंग करणे हिताचे

जपानमध्ये मार्केटिंग करणे हिताचे


औरंगाबाद : जपानमधील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करायची असल्यास ते सर्वात अगोदर पोषक वातावरण, सोयीसुविधा आदी मुद्यांचा विचार करणार. मराठवाड्यात त्यांना आकर्षित करायचे असल्यास तेथे जाऊन मार्केटिंग करावी लागेल, असा खाजगी सल्ला वाणिज्य दूतावासातील प्रमुख अरविंदसिंग यांनी दिला.
सिंग रविवारी खाजगी कार्यक्रमानिमित्त औरंगाबादेत आले होते. सीएमआयए या औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली.
मराठवाड्यात जपानच्या कंपन्यांनी गुंतवणूक करावी यासाठी भारतीय दूतावासाने सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला डीएमआयसीच्यादृष्टीने भविष्यात कशी तयारी करावी, याबाबत मार्गदर्शन केले.
सिंग महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी औरंगाबादेतच प्रोबेशन पिरीयड पूर्ण केला. येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काही वर्षे काम केले. शहराशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी खाजगीत काही सल्ले औद्योगिक संघटनांना दिले. यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा, उपाध्यक्ष आशिष गर्दे, सचिव रितेश मिश्रा, माजी अध्यक्ष उल्हास गवळी, उमेश दाशरथी, मुकुंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Interest in marketing in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.