वाळूजमध्ये डॉक्टरला शिवीगाळ, कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:03 IST2021-05-01T04:03:26+5:302021-05-01T04:03:26+5:30

:आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज महानगर : वाळूजमध्ये खाजगी दवाखान्यात धुडगूस घालत डॉक्टरला शिवीगाळ करुन कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध वाळूज ...

Insulting doctors, beating employees in the sand | वाळूजमध्ये डॉक्टरला शिवीगाळ, कर्मचाऱ्यांना मारहाण

वाळूजमध्ये डॉक्टरला शिवीगाळ, कर्मचाऱ्यांना मारहाण

:आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : वाळूजमध्ये खाजगी दवाखान्यात धुडगूस घालत डॉक्टरला शिवीगाळ करुन कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील डॉ.सुनील लघाने यांच्या खाजगी रुग्णालयात गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास निशांत जाधव हा त्याची आजारी आई आशाबाई जाधव हिला घेऊन आला होता. यावेळी डॉ. लघाने हे आशाबाई यांची तपासणी करीत असतानाच निशांतने दारुच्या नशेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी निशांतने महिन्याभरापूर्वी त्याचा भाऊ गणपतवर तुम्ही चांगले उपचार केले नसल्याने त्याचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याचा आरोप करीत वाद घातला. रुग्णालयातील कर्मचारी सुधीर भाग्यवंत, लक्ष्मण काकडे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी निशांतने संगणक खाली फेकले. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या किशोर जानुसे यालाही निशांतने मारहाण केली. या प्रकरणी डॉ.सुनील लघाने यांच्या तक्रारीवरुन निशांत जाधवविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Insulting doctors, beating employees in the sand