अपुरे मनुष्यबळ; तरीही कार्य कौतुकास्पद
By Admin | Updated: May 27, 2017 23:02 IST2017-05-27T22:59:06+5:302017-05-27T23:02:00+5:30
बीड : सैराट झालेल्या प्रेमीयुगूलांसह हरवलेल्या, अपहरण झालेल्या मुलांना त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचे उत्कृष्ट काम बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने करून दाखविले आहे.

अपुरे मनुष्यबळ; तरीही कार्य कौतुकास्पद
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सैराट झालेल्या प्रेमीयुगूलांसह हरवलेल्या, अपहरण झालेल्या मुलांना त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचे उत्कृष्ट काम बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने करून दाखविले आहे. बीडसह चार जिल्ह्यांचा भार केवळ एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांवर आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही नऊ महिन्यात १५ मुलांना शोधण्याचे काम या कक्षाने केले आहे.
अल्पवयीन मुलांचे अपहरण, पळून जाणे यासारख्या कारणांमुळे कुटुंबिय त्रस्त असायचे. ही मुले आई-वडिलांना सापडून देण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या. बीडमध्ये हा कक्ष सुरू करण्यासाठी २०१२ साली मान्यता मिळाली. २०१४ साली या कक्षात अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. या कक्षातून बीडसह उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद शहरातील प्रकरणांचा तपास केला जात आहे.
ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चार महिन्यात पोलिसांनी तपास नाही केल्यास, हे प्रकरण या कक्षाकडे वर्ग केले जाते. त्यानंतर हा कक्ष आपल्याकडे असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळावरही मुलांचा शोध चपळाईने घेतात.