तीन प्रकारच्या याद्या तयार करण्याचे बँक अधिकाऱ्यांना निर्देश
By Admin | Updated: July 5, 2017 00:33 IST2017-07-05T00:32:39+5:302017-07-05T00:33:49+5:30
औरंगाबाद : कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर तीन याद्या तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तीन प्रकारच्या याद्या तयार करण्याचे बँक अधिकाऱ्यांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर एकूूण थकबाकीदार शेतकरी, २०१२-१५ या काळात पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची यादी, तसेच २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा तीन याद्या तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत. या याद्या आठ दिवसांत तयार करण्याचे निर्देश असले तरी त्या होतात का, ते आता पाहावयाचे!
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यास जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे अधिकारी, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी, तालुक्यातील सहायक निबंधक, उपनिबंधक आदींची उपस्थिती होती. येत्या ११ जुलै रोजी यासंदर्भात पुढील बैठक होईल.
दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. एकूण थकबाकीदार शेतकरी, २०१२-१५ या काळात पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची यादी, तसेच २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा तीन याद्या याशिवाय दीड लाख रुपये कर्ज असलेले शेतकरी आणि दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी यांचीही यादी तयार करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.