‘एसटी’ चालकांना सतर्कतेच्या सूचना
By Admin | Updated: August 4, 2016 00:38 IST2016-08-04T00:28:40+5:302016-08-04T00:38:36+5:30
औरंगाबाद : महाड-पोलादपूरदरम्यान पुलावरून बस वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने चालकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

‘एसटी’ चालकांना सतर्कतेच्या सूचना
औरंगाबाद : महाड-पोलादपूरदरम्यान पुलावरून बस वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने चालकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असेल तर ‘एसटी’ नेण्याचे नाहक धाडस करू नका, अशी सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी दिली. महाड येथील घटना तसेच वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांत दिलेला अतिदक्षतेचा इशारा, यामुळे एस. टी. महामंडळानेही सुरक्षेचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील या तीन तालुक्यांमध्ये ये-जा करणाऱ्या चालकांना विशेष करून सूचना करण्यात आली आहे. औरंगाबाद-नाशिक रस्त्यावरील पूल पाण्याखाली आला. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या बससेवेवरही परिणाम झाला.
शहरात चौथ्या दिवशीही रिमझिम सुरूच
औरंगाबाद : शहरात बुधवारीही दिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण कायम राहिले. दुपारी काही वेळासाठी बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेत ६ मि. मी. पावसाची नोंद झाली. शहरात चार दिवसांपासून पावसाने तळ ठोकला आहे. रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस पावसाने तुरळक हजेरी लावली.